Enquire Now!

ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत सराव आणि प्रक्रिया

 

भारतामध्ये, जागरूक ग्राहकाचे सक्षमीकरण होणे ही अजूनही दूरची बाब आहे. गळेकापू स्पर्धा आणि त्याच्या जोडीला प्रथम राहण्याची ईर्षा, यामुळे निर्माते, विक्रेते आणि सेवा पुरवठादार निकृष्ट दर्जाची उत्पादने आणि सेवा पुरवतात, आणि त्यानंतर अनेकदा अनैतिकपणे जबाबदारीपासून पळ काढतात. ग्राहक संरक्षण कायदा १९८६, ग्राहकांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर हत्यार देत असला तरी, मार्गदर्शनाचा अभाव आणि कोणती कार्यपद्धती अवलंबायची यासंबंधी स्पष्ट समज नसणे यामुळे ग्राहक हताश होतानाच दिसतो. त्यामुळे, त्यांची इच्छा असली तरी त्यांना या कायद्याअंतर्गत त्यांच्या समस्येचे निवारण करून घेता येत नाही.

जागरूक ग्राहकांना सक्षम करणे हा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे. तसेच ग्राहकाची तक्रार नोंदवण्याची कार्यपद्धती, ग्राहक मंचाकडे जाण्याची प्रक्रिया, लागू असणाऱ्या कायद्यांचे तपशीलवार वर्णन, जोडीला उदाहरणे आणि समजून घेणे सुलभ व्हावे यासाठी केस स्टडी या सर्वांशी परिचित होण्यासाठी हा कायदा वकील आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांना सहाय्यक ठरेल.

अभ्यासक्रमाचा परिणाम

 
 

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, तुम्ही खालील गोष्टी करण्यास सक्षम व्हाल:

  • ग्राहक संरक्षण आणि माहितीचा अधिकार कायदा यांच्या तरतुदींची व्याख्या करू शकता आणि त्या परिस्थितीप्रमाणे लागू करू शकता
  • ग्राहक तक्रारीचा मसुदा सहजपणे तयार करू शकता
  • ग्राहक मंचाकडे आत्मविश्वासाने जाऊ शकता आणि तंटा निवारण यंत्रणेची तुम्हाला जाणीव असते
  • खर्च-लाभ यांचे विश्लेषण करू शकता

अभ्यासक्रमाची रूपरेखा

 
 
  • मोड्यूल 1 – ग्राहक संरक्षण कायद्याचा परिचय
  • मोड्यूल 2 – भारतामध्ये ग्राहकाचे संरक्षण कसे होते?
  • मोड्यूल 3 – ग्राहक संरक्षण कायदा, 1986
  • मोड्यूल 4 – ग्राहक संरक्षण मंचाची स्थापना आणि कार्ये
  • मोड्यूल 5 – ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा
  • मोड्यूल 6 – जिल्हा ग्राहक संरक्षण मंच
  • मोड्यूल 7 – राज्य ग्राहक तंटा निवारण आयोग
  • मोड्यूल 8 – राष्ट्रीय ग्राहक तंटा निवारण आयोग
  • मोड्यूल 9 – निष्कर्ष
  • प्रमाणपत्र परिक्षा/मूल्यांकन

CERTIFICATION

 

Honors Badge

हा अभ्यासक्रम कोणी पूर्ण करावा?

  • ग्राहक
  • सेवा आणि उत्पादने पुरवणाऱ्या कंपन्या
  • वकील
  • कायद्याचे विद्यार्थी
  • ग्राहक कायद्यांमध्ये रस असणारे इतर भागीदार

स्तर: सुरुवातीचा

भाषा: मराठी

कालावधी: 6 महिने

मूल्यमापनाची पद्धत

अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व असाईनमेंट सादर केल्या पाहिजेत आणि अभ्यासक्रमाच्या अखेरीस प्रमाणपत्र परीक्षेत किमान 50 % गुण मिळवले पाहिजेत.

लेखकाविषयी

प्रेमलाथा एस 13 वर्षांपेक्षा अधिक जबरदस्त अनुभवांसह एक वकील आणि कायदेशीर सल्लागार आहेत. कर्नाटक हायकोर्ट, ट्रायल कोर्ट्स, मोटर अपघात दावे ट्रिब्युनल, कन्ज्यूमर फोरम, डेट रिकव्हरी ट्रिब्यूनल, कर्नाटक प्रशासनिक न्यायाधिकरण, लेबर कोर्ट आणि अर्ध-न्यायिक अधिकारी आणि वैकल्पिक विवाद यंत्रण . सध्या, ग्राहक संरक्षण, मालमत्तेचे व्यवहार, कौटुंबिक बाबी, वैकल्पिक विवाद यंत्रणा, बँकिंग आणि विमा, कायदेशीर पूर्तता यासारख्या विविध प्रकारचे क्लायंट असलेल्या ग्राहकांना व्यावसायिक सल्ला देणारी एक कन्सलटन्सी कंपनी आहे.

Learners who viewed in this course, also viewed:

Let’s Start Chatbot