Enquire Now!

महिला कर्मचाऱ्यांसाठी मातृत्वाचे लाभ

 

मुलाला जन्म दिल्यामुळे, स्त्रियांनी निवडलेल्या कारकिर्दीत पुढे जाण्याच्या आणि कामाच्या ठिकाणी यशप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याच्या त्यांच्या स्वप्नांचा अंत होऊ नये. हे लक्षात ठेवून सरकारने महिलांना त्यांच्या मुलाबरोबर वेळ घालवण्यासाठी आवश्यक अवकाशाची आणि वेळेची परवानगी देऊन, त्यांच्या मातृत्वाच्या प्रतिष्ठेचे जतन करून, तसेच आई आणि बाळाच्या आरोग्याला सुरक्षा पुरवून, खासगी आणि सरकारी संस्थांमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची हमी दिली आहे. मात्र, कायद्याच्या अंमलबजावणीसाठी घटनात्मक पाया आणि कारणमीमांसा आणि कर्मचाऱ्यांसंबंधी समकालीन मानदंडाच्या संदर्भात उपयोजन आणि सध्याचे सामाजिक कल या गोष्टी समजून घेणे आवश्यक असते.

या अभ्यासक्रमात मातृत्व लाभ कायदा, 1961 चे मूलभूत तत्त्वे, त्याचा घटनात्मक आधार आणि इतिहास, त्यामधील निरनिराळे कलमे, मातृत्व रजेच्या निरनिराळ्या तथ्यांची हाताळणी करणे, हे हक्क मिळवण्यात अडथळे निर्माण करू शकणाऱ्या परिस्थिती आणि अटी, अशा हक्कांचे उल्लंघन केले जाते तेव्हा करण्याच्या आवश्यक कृती यांची चर्चा करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम विशेषतः कामाच्या ठिकाणी असणाऱ्या महिलांसाठी लाभदायक आहे, कारण त्यामध्ये, नियोक्त्यांकडून कायद्यांचे उल्लंघन झाल्यास कृती करता येईल, अशा प्रकारे मूळ हक्क राबवण्यासाठी लागू असलेल्या कायद्यांच्या सखोल ज्ञानाची तरतूद करण्यात आलेली आहे.

अभ्यासक्रमाचा परिणाम

 
 

हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तुम्ही खालील गोष्टी करू शकाल:

  • भारतामध्ये मातृत्व लाभ कायद्याची योजनाबद्ध क्रांती आणि विकास स्पष्ट करणे आणि मातृत्व हक्काचे संरक्षण करण्याची आज्ञा देणाऱ्या घटनात्मक तरतुदी
  • संपूर्ण मातृत्व लाभ कायदा, १९६१ चे महत्त्व माहिती असणे आणि जागतिक मातृत्व कायद्याच्या प्रांतामध्ये तुलनात्मक दर्जा कसा आहे हे माहिती असणे
  • तातडीच्या आव्हानांवर मात करून सध्याच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी प्रगत संशोधनाच्या (आकडेवारी, अहवाल, कल) आधारावर तर्कशुद्ध सूचना करणे

अभ्यासक्रमाची रूपरेखा

 
 
  • मोड्यूल 1 – परिचय
  • मोड्यूल 2 – मातृत्व लाभ कायदा, १९६१
  • मोड्यूल 3 – खासगी आणि सरकारी संस्थांमध्ये मातृत्वाचे लाभ
  • मोड्यूल 4 – निष्कर्ष
  • प्रमाणपत्र परीक्षा/मूल्यांकन

CERTIFICATION

 

Honors Badge

हा अभ्यासक्रम कोणी शिकावा?

  • वकील
  • कायदेशीर सल्लागार
  • महिला कर्मचारी
  • कायद्याचे विद्यार्थी आणि संशोधक
  • मातृत्व लाभ कायदा शिकण्यात रस असलेले इतर भागीदार

स्तर: सुरुवात

भाषा: मराठी

कालावधी: 6 महिने

मूल्यमापनाची पद्धत

विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या अखेरीस परीक्षा दिली पाहिजे आणि अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किमान 50% गुण मिळवले पाहिजेत.

लेखकाविषयी

अनन्या सरकारी या दिल्लीमध्ये वकील आहेत, सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील पद्मभूषण पीपी राव यांच्या मार्गदर्शनाखाली त्या काम करत आहेत. त्यापूर्वी त्या कॉर्पोरेटमध्ये कायदेशीर अधिकारी म्हणून काम करत होत्या. त्यांनी केआयआयटी लॉ स्कूल, भुवनेश्वर येथून पदवी प्राप्त केली आहे, करविषयक कायद्यांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे.

Learners who viewed in this course, also viewed:

Let’s Start Chatbot