Enquire Now!

पर्यावरणीय कायदा फाउंडेशन कोर्स

 

झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकरण यांच्यामुळे आपल्या इकोसिस्टीमचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यामुळे पर्यावरणावर परिणाम घडवणाऱ्या बदलांवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक झाले आहे. अशा प्रकारे सरकारी आणि निम-सरकारी संस्थांनी लोक आणि पर्यावरम यांच्यामध्ये संतुलन साधण्यासाठी कायदे, नियम आणि उपशमन धोरणे आखली आहेत. भारतामध्ये, आपले भौगोलिक-राजकीय हवामान पाहता, वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमध्ये साधनसामग्रींच्या उपलब्धीमध्ये असणाऱ्या विषमतेमुळे गुंतागुंतीची परिस्थिती उद्भवते. ही विषमता आणि त्याच्या जोडीला इतर काही घटक यांच्यामुळे निरनिराळ्या सरकारी संस्थांदरम्यान, राज्ये आणि औद्योगिक संस्थांदरम्यान आणि व्यक्ती व राज्यादरम्यान अनेक कायदेशीर संघर्ष निर्माण होतात. अशा प्रकारे, पर्यावरणाशी संबंधित कायदे व नियम यांच्याबद्दल चांगली कल्पना असलेले आणि कायद्याच्या चौकटीत सुरळीतपणे काम करण्यासाठी या भागीधारकांना मदत करणारे वकील आणि व्यावसायिक यांची मागणी वाढत आहे.

तुम्हाला कायदेशीर परिभाषा, साधने, तत्त्वे, मूलभूत हक्क, आपल्या देशातील साधनसामग्रींचे जतन व संरक्षण करण्यासाठी सरकारतर्फे स्थापन केलेल्या संस्था आणि योजलेले उपाय या सर्वांचा परिचय करून देण्यासाठी या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. पर्यावरणासंबंधी कायद्याच्या क्षेत्रात काम करणाच्या इच्छा असणारे विद्यार्थी, संशोधक आणि कायदे यांना या अभ्यासक्रमाचा अतोनात फायदा होईल.

अभ्यासक्रमाचा परिणाम

 
 

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही खालील गोष्टी करू शकाल:

  • आपल्या पर्यावरणाच्या विविध घटकांचे महत्त्व याच्याशी जोडले जाणे
  • पर्यावरणाशी संबंधित कायदे लागू करणे व त्यांचे विश्लेषण करणे आणि प्रस्थापित संस्थांची भूमिका
  • सरकारसमोर उभी असलेली आव्हाने आणि संवर्धनाच्या धोरणाची अंमलबजावणी

अभ्यासक्रमाची रूपरेखा

 
 
  • मोड्यूल 1 – पर्यावरणासंबंधीच्या कायद्यांचा उदय
  • मोड्यूल 2 – जंगले, वन्यजीवन आणि जैविक विविधता
  • मोड्यूल 3 – पाणी, सागरी आणि हवेसंबंधीचे कायदे
  • मोड्यूल 4 – पर्यावरण संरक्षणासाठीचे कायदे आणि महा प्रकल्प
  • मोड्यूल 5 – पंचायत कायदे आणि नैसर्गिक साधनसामग्रींचे व्यवस्थापन
  • मोड्यूल 6 – ऊर्जा, हवामान बदल आणि पर्यावरण
  • प्रमाणपत्र परीक्षा/मूल्यांकन

CERTIFICATION

 

Honors Badge

हा अभ्यासक्रम कोणी शिकावा?

  • वकील, कायदेशीर सल्लागार
  • कायद्याचे विद्यार्थी
  • पर्यावरणवादी आणि पर्यावरणविशेषज्ञ
  • भारतातील पर्यावरणविषयक आणि कायदेशीर यंत्रणेचा परिचय करून घेण्यात रस असलेले इतर भागीदार.

स्तर: सुरुवातीचा

भाषा: मराठी

कालावधी: 6 महिने

मूल्यमापनाची पद्धत

अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व असाईनमेंट सादर केल्या पाहिजेत आणि अभ्यासक्रमाच्या अखेरीस प्रमाणपत्र परीक्षेत किमान 50 % गुण मिळवले पाहिजेत.

लेखकाविषयी

एन्व्हायरो लीगल डिफेन्स फर्म (ईएलडीएफ) पर्यावरण आणि दोन्ही ग्रामीण आणि शहरी सेटिंग्ज मध्ये वापरले जाऊ शकते असे विकास कायदा संशोधन प्रदान, प्रशिक्षण विभाग विकसित आणि तरुण प्रोत्साहित करण्यासाठी एक मंच उपलब्ध 2 ऑक्टोबर 1999, स्थापना भारतातील पहिले पर्यावरण कायदा टणक आहे पर्यावरण आणि विकासाच्या क्षेत्रात निवडण्यासाठी वकील. ईएलडीएफ च्या कायदेशीर व्यावसायिकांची संघटना ईशा कृष्ण हे पर्यावरण, वन्यजीव आणि संरक्षित क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत; वनीकरण, शासन आणि पर्यावरणीय मंजुरीचा तज्ज्ञ सलीक शाफिक; जल आणि पाण्याच्या प्रवाहाच्या तज्ज्ञ उपामा भट्टाचार्य, आणि हवा आणि ध्वनी प्रदूषण संबंधित कायदे; महासागर, बंदर, वायू आणि ध्वनी प्रदूषण, आणि वन्यजीव यांच्यावरील तज्ञ किथ वर्गीस; Eeshan चतुर्वेदी, ज्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदा, नूतनीकरणक्षम उर्जा, हवामानातील बदल आणि जैव विविधता कौशल्य लबाडीचा भागात; विकेंद्रीकृत शासन आणि आदिवासी जमातींचा तज्ञ कृष्ण श्रीनिवासन; आणि श्यामाचारण Kuriakose, व्याज ज्या भागात, जंगल संवर्धन, जैवविविधता, सत्तेचे विकेंद्रीकरण आणि स्वत: ची शासन, समुद्र, वन्यजीव आणि पारंपारिक ज्ञान आहे.

Learners who viewed in this course, also viewed:

Let’s Start Chatbot