Enquire Now!

मृत्यूपत्र : मूलभूत गोष्टी, आव्हाने आणि तयार करणे

 

तुमच्याकडे अशी कोणती मालमत्ता आहे का जी तुम्हाला तुमच्या प्रियजनांना द्यायची इच्छा आहे? तुमच्या गैरहजेरीमध्ये तुमच्या मुलांचे पालकत्व कोणाकडे सोपवायचे आहे? इच्छापत्र म्हणजे गोंधळ होणार नाही यासाठी केलेला निश्चित नियम! असा एक सामान्य गैरसमज आहे की तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या मालकीच्या वस्तू थेट तुमच्या पुढील नातेवाईकांकडे जातील, पण तसे होत नाही. भारतामध्ये, मालमत्तेच्या वितरणावरून अनेक घरांमध्ये भांडणे आहेत. अशा प्रकारे, मृत्यूपत्र तयार केल्याने तुमच्या इच्छेप्रमाणे मालमत्तेचे कुटुंबामध्ये वितरण होण्याची खबरदारी घेतली जाते आणि भांडणे होत नाहीत. अनेकदा वकीलच व्यक्तीचे मृत्यूपत्र तयार करून देतात, त्यांना हे इच्छापत्र व्यवस्थित समजावून सांगणे आवश्यक असते.

मृत्यूपत्राचा मसुदा तयार करण्याविषयी असलेले गैरसमज दूर करणे हा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे. मृत्यूपत्र तयार करताना त्याच्या जोडलेल्या परिभाषा, यासह प्रकार आणि पोटनियम यामुळे मृत्यूपत्र वैध ठरते, त्याबद्दल येथे तपशीलवार चर्चा केली आहे. मृत्यूपत्राचे नमुने देखील देण्यात आलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला समजण्यात मदत होईल आणि तुमचे स्वतःचे मृत्यूपत्र कसे तयार करायचे याबद्दल तुम्हाला मुद्दे प्रदान केले जातात. हा अभ्यासक्रम वकिलांसाठी देखील सहाय्यक आहे, कारण ते गरज असलेल्यांना मदत करतात.

अभ्यासक्रमाचा परिणाम

 
 

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, तुम्ही खालील गोष्टी करण्यास सक्षम व्हाल:

  • सामान्य गैरसमज दूर करणे
  • मृत्यूपत्राचा मसुदा तयार करताना त्याच्याशी संबंधित महत्त्वाच्या व्याख्या ओळखणे
  • मृत्यूपत्राचा मसुदा तयार करण्याच्या लाभांचे विश्लेषण करणे
  • मृत्यूपत्रांच्या प्रकारांमधील फरक ओळखणे
  • मृत्यूपत्राची गरज आणि त्याचा मसुदा तयार करण्याचा मार्ग

अभ्यासक्रमाची रूपरेखा

 
 
  • मोड्यूल 1 – मृत्यूपत्र आणि इच्छापत्र : संकल्पना
  • मोड्यूल 2 – वारसाहक्काचा कायदा
  • मोड्यूल 3 – मृत्यूपत्र तयार करणे
  • प्रमाणन परीक्षा / आकलन

CERTIFICATION

 

Honors Badge

हा अभ्यासक्रम कोणी पूर्ण करावा?

  • वकील
  • कायदेशीर सल्लागार आणि मार्गदर्शक
  • संशोधन विद्यार्थी
  • मृत्यूपत्राचा मसुदा तयार करण्याची इच्छा असलेले सामान्य लोक

स्तर: नवशिक्या

भाषा: मराठी

कालावधी: 6 महिने

मूल्यमापनाची पद्धत

अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व असाईनमेंट सादर केल्या पाहिजेत आणि अभ्यासक्रमाच्या अखेरीस प्रमाणपत्र परीक्षेत किमान 50% गुण मिळवले पाहिजेत.

लेखकाविषयी

प्रेमलता एस या १३ वर्षांचा उठावदार अनुभव असलेल्या वकील आणि कायदेशीर सल्लागार आहेत. त्यांनी कायदा आणि न्यायव्यवस्थेच्या विविध संस्थांमध्ये भरीव प्रॅक्टिस केली आहे, त्यामध्ये कर्नाटक उच्च न्यायालय, ट्रायल कोर्ट, मोटार अपघात दावा लवाद, ग्राहक मंच, कर्ज वसुली लवाद, कर्नाटक प्रशासकीय लवाद, कामगार न्यायालय आणि अर्ध-न्यायिक अधिकारी आणि पर्यायी तंटा यंत्रणा यांचा समावेश आहे. सध्या त्या कन्सल्टन्सी फर्मच्या प्रमुख आहेत, ही फर्म विविध प्रकारच्या क्लायंटना कायदेविषयक सेवा पुरवते, त्यामध्ये ग्राहक संरक्षण, मालमत्ता हस्तांतरण, कौटुंबिक वाद, पर्यायी तंटा निवारण यंत्रणा, बँकिंग आणि विमा, कायदेशीर अनुपालन आणि असे बऱ्याच क्षेत्रांमधील वैयक्तिक आणि कंपनी क्लायंटचा समावेश असतो.

Learners who viewed in this course, also viewed:

Let’s Start Chatbot