Enquire Now!

भारतात सरोगसीचा कायदा

 

‘गर्भाशय भाड्याने देणे’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सरोगसीवर मानवी पुनरुत्पादन यंत्रणेचे वस्तूकरण, व्यावसायिकीकरण आणि शोषण केल्याची टीका होते. सरोगसी अनैसर्गिक आहे असे काहीजण मानतात, तर अनेक मुल नसलेल्या जोडप्यांसाठी ती पालकत्वाचा आनंद मिळवून देणारी संधी असते. कमी खर्च आणि अनुकूल कायदेशीर वातावरण यामुळे सरोगसीसाठी भारताला सर्वाधिक पसंती दिली जाणाऱ्या भारतामध्ये, ठळक नियम आणि संबंधित पक्षांच्या जबाबदारीचा अभाव आहे. त्यामुळे धोरणकर्ते, सरोगेट माता, इच्छुक पालक, कायदेशीर सल्लागार, इत्यादींसह सर्व भागीदारांमध्ये बरीच संदिग्धता असते.

हा अभ्यासक्रम सरोगसीच्या, विशेषतः व्यावसायिक सरोगसीच्या संकल्पनेसंबंधी स्पष्टता प्रदान करतो. हा अभ्यासक्रम सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान (नियमन) विधेयक २०१३; भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद मार्गदर्शक तत्त्वे, २००५; आणि व्यावसायिक सरोगसीवर सरकारचे धोरण यांच्यासह संबंधित कायद्यांची चर्चा करत व्यावसायिक सरोगसीमध्ये असलेल्या कायदेशीर समस्या स्पष्ट करून सांगतो. सरोगेट माता आणि इच्छुक मातांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल, कारण त्यामध्ये घटनांचा अभ्यास करण्यात आला आहे, सरोगसीसंबंधी निरनिराळे करार स्पष्ट करण्यात आले आहेत आणि प्रक्रिया व कायदा यांच्या स्पष्टतेसाठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न प्रदान करतो.

अभ्यासक्रमाचा परिणाम

 
 

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही खालील गोष्टी करू शकाल:

  • सरोगसीची संकल्पना समजून घेणे
  • सरोगसीवर सध्याची कायदेशीर चौकट समजून घेणे
  • सरोगसीमध्ये असलेल्या कायदेशीर समस्यांबद्दल कुटुंबांना सल्ला देणे

अभ्यासक्रमाची रूपरेषा

 
 
  • मोड्यूल 1 – परिचय
  • मोड्यूल 2 – व्यावसायिक सरोगसीमधील कायदेशीर समस्या
  • मोड्यूल 3 – निष्कर्ष
  • प्रमाणपत्र परीक्षा/मूल्यांकन

CERTIFICATION

 

Honors Badge

हा अभ्यासक्रम कोणी शिकावा?

  • वकील
  • कायदेशीर सल्लागार
  • संशोधक विद्यार्थी
  • सरोगेट माता
  • सरोगसी कायद्यामध्ये रस असलेले सामान्य लोक

स्तर: सुरुवात

भाषा: मराठी

कालावधी: 6 महिने

मूल्यमापनाची पद्धत

विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या अखेरीस परीक्षा दिली पाहिजे आणि अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किमान 50% गुण मिळवले पाहिजेत.

लेखकाविषयी

हरलीन कौर या लिंगाधारित अधिकाराच्या क्षेत्रात दिल्ली आणि चंदिगडमध्ये २०१३पासून काम करणाऱ्या वकील आहेत. लैंगिक छळ प्रतिबंध आणि कामाच्या जागी विविधता या विषयावर नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशियल सायन्सचा ऑनलाईन डिप्लोमाची संकल्पना मांडणाऱ्या आणि आराखडा तयार करणाऱ्या टीममध्ये त्या सक्रियपणे सहभागी होत्या. संघटनांच्या आयसीसीसाठी बाह्य सदस्य आणि शिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे, तसेच लिंग आणि कामगार हक्कांच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक व्यावसायिकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या आहेत.

Learners who viewed in this course, also viewed:

Let’s Start Chatbot