Enquire Now!
Welcome Guest

वैद्यकीय कायदे

 

वैद्यकीय व्यावसायिकांनी नेहेमी रूग्णांच्या सर्वसाधारण हितासाठीच निवड केली पाहीजे. परंतु, आरोग्यचिकित्सेच्या विभिन्न परिस्थिती आणि रचना गुंतागुंतीच्या असतात, आणि विशिष्ट स्थितीला सामोरे जाताना योग्य निर्णय घेणे कठीण होऊ शकते. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी हे आवश्यक आहे त्यांनी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या रूग्णांसाठी केलेल्या कृती आणि निर्णयांचे कायदेशीर परिणाम कसे होतात ते समजून घेतले पाहीजे, हे अधिकच आवश्यक आहे कारण कायदे-वैद्यक खटल्यांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ होत आहे. अशाच प्रकारे, कायदे व्यावसायिक जे वैद्यकीय कायदे समाविष्ट असलेले खटले हाताळू इच्छितात त्यांना त्यांच्या व्यक्तिगत विश्वासाच्या दृष्टीकोनातून आरोग्यचिकित्सेच्या गुंतागुंतीच्या परिस्थिती समजणे अवघड जाते. अशा प्रकारे, हे दोन्ही वैद्यकीय आणि कायदे व्यावसायिकांसाठी यशस्वीपणे व्यवसाय करण्यासाठी वैद्यकीय कायदे वस्तुनिष्ठपणे समजून घेणे महत्वपूर्ण आहे.

वैद्यकीय कायद्यांविषयी हा कोर्स वैद्यकीय निष्काळजीपणाच्या खटल्यांना प्रतिबंध आणि बचाव करण्यासाठी कायदे-वैद्यक मार्गदर्शन, वैद्यकीय आचारसंहिता, निर्णायक टप्प्यांचे निकाल आणि प्रभावी धोरणांच्या दोन्ही संकल्पनेच्या आणि व्यवहारीपणाच्या बाजू स्पष्ट करतो. या कोर्सचे मुख्य लक्ष्य आहे विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विचार करण्यास मदत करणे आणि आरोग्यचिकित्सा क्षेत्राला जे धोके आणि समस्यांनी घेरले आहे त्यांच्याविषयी संवेदनशील होणे.

शिकण्याचे निष्कर्ष

 
 

कोर्स पूर्ण केल्यानंतर, वैद्यकीय व्यावसायिक आणि व्यवस्थापक निम्नलिखित मध्ये सक्षम होतील:

 • दैनंदिन वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित संभाव्य कायदे-वैद्यक परिणाम ओळखणे
 • वैद्यकीय निष्काळजीपणाच्या खटल्यांना प्रतिबंध आणि त्यापासून परिणामकारकपणे बचाव करण्यासाठी धोरणांचा उपयोग करणे

कोर्स पूर्ण केल्यानंतर, वकील निम्नलिखित मध्ये सक्षम होतील:

 • डॉक्टर आणि रूग्णालयांना विभिन्न कायदे-वैद्यक परिस्थितींमध्ये सल्ला देणे
 • न्यायालयांमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणाच्या खटल्यांशी संबंधित त्यांच्या कायदा व्यवसायात सुधारणा करणे

कोर्सची रूपरेखा

 
 
 • मोड्यूल 1 – वैद्यकीय कायद्याचे अवलोकन
 • मोड्यूल 2 – वैद्यकीय आचारसंहितेचे अवलोकन
 • मोड्यूल 3 – वैद्यकीय व्यावसायिक आणि रूग्णांचे अधिकार आणि कर्तव्ये
 • मोड्यूल 4 – वैद्यकीय रेकॉर्ड्स
 • मोड्यूल 5 – वैद्यकीय गोपनीयतेचा परिचय
 • मोड्यूल 6 – माहितीपूर्ण संमती
 • मोड्यूल 7 – वैद्यकीय निष्काळजीपणाचे अवलोकन
 • प्रमाणपत्र परिक्षा/ मूल्यांकन

हा कोर्स कोणी केला पाहीजे?

 • डॉक्टर
 • नर्सेस
 • रूग्णालय व्यवस्थापक
 • वकील
 • कायदे विद्यार्थी
 • रूग्ण
 • आरोग्यचिकित्सा उद्योगातील भागधारक
 • हा कोर्स करण्यासाठी तुम्ही वकील असणे जरूरी नाही

स्तर: नवीन सुरवात करणारे

भाषा: मराठी

व्हिडिओ लेक्चर्स: 42-मिनिटांसाठी असलेली व्हिडिओ लेक्चर्स

मूल्यांकन पद्धत

प्रत्येक मोड्यूलच्या अखेरीस कोडी आणि असाइनमेंट देऊन प्रगतीची चांचणी घेतली जाईल. विद्यार्थ्यांनी कोर्सच्या अखेरीस परिक्षा दिली पाहीजे आणि कोर्सचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कमीतकमी 50% गुण प्राप्त केले पाहीजेत.

लेखकाविषयी

डॉ. व्ही. पी. सिंग हे कायदे-वैद्यक सल्लागार आहेत, आणि दोन्ही मेडिसीन आणि कायद्यामध्ये प्रमाणित आहेत. त्यांनी त्यांचे M.B.B.S. आणि M.D. फॉरेन्सिक मेडिसीन मध्ये GMC पतियाळा येथून आणि LL.B. UILS, पंजाब युनिव्हर्सिटीमधून केले आहे. त्यांनी वैद्यकीय कायदे आणि आरोग्यचिकित्सा गुणवत्ता प्रबंधन, PGD कायदे-वैद्यक प्रणालीमध्ये प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केले आहेत. डॉ.सिंग यांनी पुस्तक, "लिगल इश्यूज इन मेडिकल प्रॅक्टीस, मेडिको-लिगल गाइडलाइन्स फॉर सेफ प्रॅक्टीस" लिहिण्यामध्ये योगदान दिले आहे.
 

Learners who viewed in this course, also viewed: