Enquire Now!

आपल्या मालमत्तेची नोंदणी कशी करावी?

 

भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तांचे हस्तांतरण मित्र आणि नातेवाईकांदरम्यान होते, त्यामुळे अनेक जण त्यांच्या नव्याने मालकीच्या झालेल्या मालमत्तांची नोंदणी करणे अत्यावश्यक समजत नाहीत. अनेक प्रकरणांमध्ये लोक ही नोंदणी उशिरा करतात, कधीकधी खरेदी केल्यानंतर काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मालकीहक्कावरून वाद उद्भवतात, कधीकधी अवैधरित्या बळकावल्यामुळे किंवा बेकायदेशीरपणे विकल्यामुळे. काही मालमत्तांचे मालक हे स्वतःच नोंदणीची प्रक्रिया करतात, तर इतर बरेच जण त्यासाठी वकिलांची मदत घेतात. तुम्ही मालमत्ता विकत घेतली असेल किंवा तुम्ही वकील असाल तर तुम्हाला मालमत्ता नोंदणीची प्रक्रिया आणि कोणताही वाद असल्यास निवारण यंत्रणेची माहिती असणे आवश्यक आहे.

या अभ्यासक्रमातून तुम्हाला कायद्याच्या चौकटीचे विश्लेषण मिळते आणि मालमत्तेच्या नोंदणी टप्प्याटप्प्याने प्रक्रियेसह त्याचा लाभ मिळतात. यामुळे तुम्हाला विक्रीच्या करार आणि कार्यवाहीसाठी स्वरुपाचा मसुदा तयार करण्याचेही प्रशिक्षण मिळते, मालमत्ता खरेदी करताना कोणत्या खबरदारी घेतल्या पाहिजेत, केस स्टडी आणि उदाहरणांसह मालमत्तेच्या ई-नोंदणीच्या प्रक्रियेची तपशीलवार माहिती, जेणेकरून मालमत्ता नोंदणी आणि मालकीहक्कासाठी सल्ला आवश्यक असलेल्यांसाठी आवश्यक ज्ञान लागू करणे आणि सल्ला देणे या गोष्टी करणे तुम्हाला शक्य होईल.

अभ्यासक्रमाचा परिणाम

 
 

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, तुम्ही खालील गोष्टी करू शकाल :

  • मालमत्तेच्या नोंदणीचे फायदे समजणे
  • मालमत्तेच्या नोंदणीवरील भारतीय कायद्याचे विश्लेषण करणे
  • मालमत्ता नोंदणीच्या प्रक्रिया समजून घेणे आणि सल्ला देणे

अभ्यासक्रमाची रूपरेखा

 
 
  • मोड्यूल 1 – मालमत्ता कायद्याचा परिचय
  • मोड्यूल 2 – मालमत्ता नोंदणी
  • मोड्यूल 3 – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
  • प्रमाणपत्र परीक्षा/मूल्यांकन

CERTIFICATION

 

Honors Badge

हा अभ्यासक्रम कोणी शिकावा?

  • स्थावर मालमत्तेचे खरेदीदार आणि विक्रेते
  • स्थावर मिळकतविषयक सल्लागार
  • वकील
  • कायद्याचे विद्यार्थी आणि संशोधक
  • भारतामधील स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणामध्ये रस असलेले इतर भागीदार

तुम्हाला हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी वकील किंवा डॉक्टर असण्याची गरज नाही.

स्तर: सुरुवातीचा

भाषा: मराठी

कालावधी: 6 महिने

मूल्यमापनाची पद्धत

अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व असाईनमेंट सादर केल्या पाहिजेत आणि अभ्यासक्रमाच्या अखेरीस प्रमाणपत्र परीक्षेत किमान 50 % गुण मिळवले पाहिजेत.

लेखकाविषयी

रोहिणी रंगचारी कर्णिक यांनी दिल्ली विद्यापीठातून 2001मध्ये कायदा या विषयाची पदवी घेतली. त्यांनी फ्रान्समधील एक्स-एन-प्रोव्हेन्समधून युरोपीय व्यावसायिक कायदे या विषयात 2002मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्यांनी स्टटगर्टमध्ये उन्हाळी इंटर्नशिप पूर्ण केली आणि पॅरिसमधेय इंटरनॅशनल चेम्बर ऑफ कॉमर्समध्ये काम केले, 2004मध्ये त्या दिल्लीला परत आल्या आणि त्यांनी दुआ असोसिएट्सकडे कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली. दिल्लीमध्ये त्यांनी कॉर्पोरेट कायदे आणि खटले या क्षेत्रामध्ये काम सुरू केले, त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने लवाद आणि बौद्धिक संपदा हक्क या विषयावर लक्ष केंद्रीत केले. त्यांनी दिल्लीमध्ये जे. सागर असोसिएट्स आणि दत्त अँड मेनन यांच्याबरोबर काम केले. त्यांनी कॉम्पिटिशन लॉ रिपोर्ट्स आणि इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ रिपोर्टर अशा काही जर्नलसह मनुपत्रचे संपादक म्हणूनही काम पाहिले. त्या सध्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये फ्रेंच आणि दिल्ली विद्यापीठाच्या दौलत राम कॉलेजमध्ये शिकवतात.

Learners who viewed in this course, also viewed:

Let’s Start Chatbot