भारतात दत्तक कायदा

 
ENROLL NOW

भारतासारख्या बहुसांस्कृतिक आणि बहुधर्मीय समाजामध्ये, अनेक संस्थांचा सहभाग आणि प्रबळ विचारसरणींमुळे मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया हा एक गुंतागुंतीचा प्रवास होतो. मूल दत्तक घेण्याची इच्छा असलेली जोडपी आणि एकल पालक यांच्यामध्ये ही प्रक्रिया, पालन करण्याचा दृष्टीकोन आणि योग्य उपाययोजना यांच्याविषयी पुरेशा जागरूकतेचा अभाव असतो, त्यामुळे दत्तक प्रक्रिया अधिकच क्लिष्ट होते. या अपुरेपणामुळे, संभाव्य पालक दत्तक देणाऱ्या संस्थांकडून होकार किंवा नकार मिळण्यासाठी वर्षानुवर्षे खर्च करतात, आणि त्यामुळे पालक होण्याच्या त्यांच्या स्वप्नांना खीळ बसते.

दत्तक प्रक्रियेविषयी कोणताही गोंधळ असल्यास तो दूर करणे आणि दत्तक घेणारे पालक, वकील, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि संशोधक, यांना स्पष्टपणे आणि अधिकाराने दृष्टीकोन प्रदान करणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. दत्तक कायद्यावर अंतर्दृष्टी, बाल न्याय कायदाअंतर्गत मंजूर कायदेशीर कार्यवाही, त्यांची मार्गदर्शक तत्त्वे, सहभागी असलेले अधिकारी आणि संस्था, आणि हिंदू, जैन, शीख, बौद्ध, मुस्लीम, ख्रिश्चन आणि पारशी यांना लागू असणारे व्यक्तिगत कायदे; यांची तपासणी केली जाते आणि हा अभ्यासक्रम अतिशय माहितीपूर्ण केला जातो.

अभ्यासक्रमाचे परिणाम

 
 

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, तुम्ही खालील गोष्टी करण्यास सक्षम व्हाल:

 • दत्तक प्रक्रियेची व्यवस्था पाहणाऱ्या आणि हिंदू, जैन, शीख, बौद्ध, मुस्लीम, ख्रिश्चन व पारशी यांना लागू होणाऱ्या व्यक्तिगत कायद्यांमध्ये फरक करणे;
 • दत्तक प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले निरनिराळे अधिकारी आणि संस्थांच्या भूमिका आणि कार्य यांचे पूर्णपणे आकलन करून घेणे;
 • दत्तक नियमन, २०१७ आणि त्या अंतर्गत नमूद केलेल्या दत्तक कार्यपद्धती यांचे महत्त्व मान्य करणे.

अभ्यासक्रमाची रूपरेखा

 
 
 • मोड्यूल 1 – दत्तकाचा अर्थ
 • मोड्यूल 2 – हिंदू, जैन, शीख आणि बौद्धांसाठी वैयक्तिक कायद्याअंतर्गत दत्तक
 • मोड्यूल 3 – मुस्लीम, ख्रिश्चन आणि पारशींसाठी वैयक्तिक कायद्याअंतर्गत दत्तक
 • मोड्यूल 4 – दत्तक व्यवस्था पाहणारे कायदे आणि सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्सेस ऑथॉरिटी (सीएआरए)
 • मोड्यूल 5 – विशेष दत्तक संस्था
 • मोड्यूल 6 – संबंधित अधिकारी आणि संस्था यांचा दत्तकामधील भूमिका
 • मोड्यूल 7 – दत्तकासाठी आवश्यक बाबी आणि दत्तक नियमन, २०१७ अंतर्गत दत्तक घेण्याची क्षमता
 • मोड्यूल 8 – दत्तक नियमन, २०१७ अंतर्गत दत्तक घेण्यासाठी मुलांशी संबंधित कामकाजाची प्रक्रिया
 • मोड्यूल 9 – दत्तक नियमन, २०१७ अंतर्गत दत्तक घेण्यासाठी संभाव्य पालकांशी संबंधित दत्तक कामकाजाची प्रक्रिया
 • मोड्यूल 10 – दत्तक घेणाऱ्या संभाव्य पालकांसाठी सामान्य प्रश्न
 • प्रमाणपत्र परीक्षा/मूल्यांकन

हा अभ्यासक्रम कोणी पूर्ण करावा?

 • संभाव्य पालक
 • सामाजिक कार्यकर्ते आणि दत्तक देणाऱ्या संस्था
 • वकील
 • कायद्याचे विद्यार्थी आणि संशोधक
 • भारतामध्ये दत्तकविधानाच्या प्रक्रियांची व्यवस्थां पाहणाऱ्या नियमांमध्ये रस असणारे इतर भागधारक
 • हा अभ्यासक्रम करण्यासाठी तुम्ही वकील किंवा डॉक्टर होण्याची गरज नाही

स्तर: सुरुवातीचा

भाषा : मराठी

मूल्यमापनाची पद्धत

अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व असाईनमेंट सादर केल्या पाहिजेत आणि अभ्यासक्रमाच्या अखेरीस प्रमाणपत्र परीक्षेत किमान 50 % गुण मिळवले पाहिजेत.

लेखकाविषयी

टीम लॉस्किल हा उत्साही आणि आवडीने काम करणारा कायदा व्यावसायिकांचा गट आहे, हा गट विद्यार्थ्यांसाठी गोष्टी अधिक चांगल्या व्हाव्यात म्हणून जास्तीचे काम करायला तयार असतो. या गटामध्ये वकील, शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणारे, कायदाविषयक संपादक आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो, ते व्यावहारिक पैलू सामावून घेणारा सर्वंकष सामग्री विकसित करण्यासाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकमेकांसोबत काम करतात.
 

Learners who viewed in this course, also viewed: