फौजदारी विनवणी : खटला आणि कामकाज

 
ENROLL NOW ALREADY ENROLLED

फौजदारी खटल्यांमध्ये असे म्हणतात की, "व्यक्ती ज्याची विनवणी करते, तेच त्या व्यक्तीला मिळण्याची अपेक्षा असते". चांगल्या प्रकारे मसुदा तयार केलेली विनवणी निकालाचा पाया रचते. यशस्वी फौजदारी वकिलांकडे लक्षवेधक कैफियतीचा मसुदा तयार करण्याची जणू काही किल्ली असते, यात काही आश्चर्य नाही. मात्र, तरुण व्यावसायिक वकिलांकडे इतक्या सहजपणे हे कौशल्य आढळत नाही, कारण वरिष्ठ वकिलांकडे तेवढा वेळ नसतो. म्हणून अगदी काही जणांनाच हे कौशल्य पुरेशा प्रमाणात मिळते.

हा अभ्यासक्रम तुम्हाला फौजदारी कैफियत मांडण्याची कला सखोलपणे समजावून सांगतो. सिद्धांतांमधून मिळालेल्या संकल्पनात्मक स्पष्टतेव्यतिरिक्त, हा अभ्यासक्रम खऱ्या जगात आवश्यक अशा व्यावहारिक पैलूवर लक्ष केंद्रीत करतो. फौजदारी कायद्यांमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या होतकरू वकिलांना हा अभ्यासक्रम सहजपणे कौशल्य मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल.

अभ्यासक्रमाचा परिणाम

 
 

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही खालील गोष्टी करू शकाल:

 • फौजदारी विनवणी दाखल करण्यासाठी घ़डामोडी, गरज आणि कार्यपद्धती समजून घेणे
 • न्यायालयीन नियमांप्रमाणे आवश्यक अर्ज, याचिका, अपीले इत्यादींचा मसुदा तयार करणे
 • फौजदारी कायद्याच्या निरनिराळ्या पैलूंशी संबंधित भाषा आणि कार्यपद्धती यांचा परिचय करून घेणे

अभ्यासक्रमाची रूपरेखा

 
 
 • मोड्यूल 1 – भारतामधील फौजदारी कैफियत आणि खटल्याचे कामकाज
 • मोड्यूल 2 – तक्रारी आणि जामिनाच्या तरतुदी
 • मोड्यूल 3 – याचिका, अपिले, पुनरावलोकन आणि किरकोळ अर्ज
 • मोड्यूल 4 – मोटार वाहन कायदा अंतर्गत दावे
 • प्रमाणपत्र परीक्षा/मूल्यांकन

हा अभ्यासक्रम कोणी शिकावा?

 • वकील
 • कायदेशीर सल्लागार
 • कायद्याचे विद्यार्थी आणि संशोधक
 • भारतामधील न्यायालयातील फौजदारी कैफियत दाखल करण्याची कार्यपद्धती शिकण्यात रस असलेले इतर भागीदार

स्तर: सुरुवातीचा

भाषा : मराठी

मूल्यमापनाची पद्धत

अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व असाईनमेंट सादर केल्या पाहिजेत आणि अभ्यासक्रमाच्या अखेरीस प्रमाणपत्र परीक्षेत किमान 50 % गुण मिळवले पाहिजेत.

लेखकाविषयी

मनीष श्रीवास्तव, व्यवस्थापकीय भागीदार – तुलिका लॉ असोसिएट, हे दिल्लीमध्ये 1999 पासून प्रॅक्टिस करणारे वकील आहेत. ते दिल्ली विद्यापीठाचे कायदा पदवीधर आहेत, ते कायद्याच्या विविध क्षेत्रांमध्ये सर्वसामान्य सल्ला, सल्लाविषयक आणि खटल्यांविषयक सेवा पुरवतात.
 

Learners who viewed in this course, also viewed: