Enquire Now!

आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदा

 

हवामान बदल हे सत्य आहे आणि ती जागतिक घडामो़ड आहे. विकसित देश दीर्घकाळापासून पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांच्या विरुद्ध टोकाला होते, आता विकसित अर्थव्यवस्थाही झपाट्याने पर्यावरणावरील परिणामाकडे दुर्लक्ष करत विकसित अर्थव्यवस्थांच्या बरोबर उभे राहत आहेत. मात्र, शाश्वत जीवनाच्या प्रसारासाठी आंतरराष्ट्रीय अधिवेशने भरवून, कायदे आणि ठराव करून हवामान बदलाचे परिणाम बंद किंवा कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नदेखील होत आहेत. जगभरातील सरकारे, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संघटना या संशोधक आणि वकिलांसाठी आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदा हे सर्वाधिक पसंतीचे क्षेत्र व्हावे यासाठी, यासाठी त्यांना प्रोत्साहन देतात.

हा अभ्यासक्रम तुम्हाला आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदे तसेच कायदेशीर परिभाषा, मूलभूत तत्त्वे आणि योग्य कामकाजावर देखरेख ठेवणाऱ्या व विकास आणि वैश्विक स्तरावर सामना कराव्या लागणाऱ्या पर्यावरणीय आव्हाने यांचा आराखाडा तयार करणाऱ्या संस्था यांच्यासह एक पार्श्वभूमी प्रदान करते. या अभ्यासक्रमात मनुष्यामुळे झालेली हानी कमी करण्यासाठी केलेले ठराव आणि अधिवेशने, परिस्थितीक मंडलाचे संरक्षण करते आणि त्यासाठी प्रारूप विकसित करते, या सर्व गोष्टींची चर्चा करण्यात आली आहे. संशोधक, वकील, सल्लागार यांना हा या विषयावर स्वतःचे ज्ञान विकसित करण्यासाठी हा अभ्यासक्रम फायदेशीर वाटेल.

अभ्यासक्रमाचा परिणाम

 
 

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, तुम्ही खालील गोष्टी करू शकाल:

 • आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदे आणि त्याची तत्त्वे यांच्यासाठी असलेली साधने समजून घेणे
 • यूएनईपीची भूमिका आणि कामकाज यांचे वर्णन करणे
 • पर्यावरणाच्या संरक्षणासाठी केलेले निरनिराळे ठराव, करार आणि अधिवेशने यांचे महत्त्व सांगणे
 • शाश्वत जीवनासाठी उपाय सुचवणे आणि त्यांचा प्रसार करणे

अभ्यासक्रमाची रूपरेखा

 
 
 • मोड्यूल 1 – आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायद्यांचा परिचय
 • मोड्यूल 2 – जल आणि वायू प्रदूषणावरील आंतरराष्ट्रीय कायदे
 • मोड्यूल 3 – फुले आणि वनस्पती यांच्यावरील आंतरराष्ट्रीय कायद्यांचे शासन
 • मोड्यूल 4 – पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल यांच्यावरील आंतरराष्ट्रीय कायदे
 • मोड्यूल 5 – पारंपरिक ज्ञान
 • प्रमाणपत्र परीक्षा/मूल्यांकन

CERTIFICATION

 

Honors Badge

अभ्यासक्रम कोणी शिकावा?

 • वकील
 • कायदेशीर सल्लागार
 • संशोधन विद्यार्थी
 • आंतरराष्ट्रीय पर्यावरणविषयक कायद्यांचा परिचय करून घेण्यात रस असलेले इतर इतर भागीदार

स्तर: सुरुवातीचा

भाषा: मराठी

कालावधी: 6 महिने

मूल्यमापनाची पद्धत

अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व असाईनमेंट सादर केल्या पाहिजेत आणि अभ्यासक्रमाच्या अखेरीस प्रमाणपत्र परीक्षेत किमान 50 % गुण मिळवले पाहिजेत.

लेखकाविषयी

एन्व्हायरो लीगल डिफेन्स फर्म (ईएलडीएफ) ही भारतातील पर्यावरणासंबंधीच्या कायद्यांची पहिली फर्म आहे, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही रचनांमध्ये वापरता येईल अशा पर्यावरण आणि विकास कायद्यांवर संशोधन प्रदान करण्यासाठी, प्रशिक्षणाचे मोड्यूल विकसित करण्यासाठी आणि तरुण वकिलांनी पर्यावरण आणि विकास या क्षेत्रांची निवड करावी म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी, २ ऑक्टोबर १९९९ रोजी या फर्मची स्थापना झाली. ईएलडीएफच्या विद्वान वकिलांच्या टीममध्ये ईशा कृष्णन, पर्यावरण, वन्यजीव आणि संरक्षित क्षेत्र यांच्यावरील तज्ज्ञ; उपमा भट्टाचार्जी, पाणी आणि पाणलोट व्यवस्थापन, आणि हवा व ध्वनी प्रदूषणशी संबधित कायदे यांच्या तज्ज्ञ; कीथ वर्गीस, महासागर, बंदरे, हवा आणि ध्वनी प्रदूषण यामधील तज्ज्ञ; ईशान चतुर्वेदी, आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदे, अपारंपरिक ऊर्जा, हवामान बदल आणि जैविक विविधता यामध्ये हे तज्ज्ञ आहेत; कृष्णा श्रीनिवासन, विकेंद्रीत शासन आणि आदिवासी जमातींचे तज्ज्ञ; आणि श्यामा कुरियाकोस, यांचे अभ्यासाचे विषय आहेत जंगले, जैविक विविधता, विकेंद्रीकरण आणि स्वंय शासन, महासागर, वन्यजीव आणि पारंपरिक ज्ञान.

Learners who viewed in this course, also viewed:

Let’s Start Chatbot