Enquire Now!

माहिती अधिकार अर्ज दाखल करण्याची रीत आणि कार्यपद्धत

 

माहिती अधिकार हे नागरिकांच्या हातातील प्रभावी हत्यार आहे. त्यामुळे प्रशासनामध्ये पारदर्शकताच नाही तर जबाबदारीचे सुद्धा भान येते. शासनावर अंकुश ठेवण्यासाठी तसेच वेगवेगळे प्रकल्प आणि कार्यक्षेत्रामध्ये केल्या जाणाऱ्या कार्याबद्दल माहिती मिळविण्यासाठी विद्यार्थी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांकडून हे व्यापक प्रमाणात वापरले जाते यात कोणतेही आश्चर्य नाही. जरी माहिती अधिकार हा लोकप्रिय तसेच व्यापक स्वरूपात वापरला जात असला तरी बऱ्याच लोकांना माहिती अधिकार हा काय आहे आणि तो कसा आणि कोठे वापरता येतो याचे ज्ञान नसल्याने त्यांच्या अर्ज करण्याच्या क्षमतेमध्ये बाधा येते.

हा अभ्यासक्रम माहिती अधिकार अर्ज दाखल करण्यासंबंधी कार्यपद्धतीचे महत्वाचे पैलू पुरवून तसेच उदाहरणे व नमुने देऊन तुम्हाला सक्षम करतो. हा माहिती अधिकार कायदा, २००५ च्या महत्वाच्या घटकांची रूपरेखा देतो ज्यायोगे सरकारी कारभारातील पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढीस लागते. हा अभ्यासक्रम माहिती अधिकार कायदा, २००५ ची प्रत्यक्ष व्यवहार्यता सांगतो आणि विविध भागधारकांमध्ये माहिती अधिकारासंबंधी सुस्पष्टता आणतो.

अभ्यासक्रमाची फलनिष्पत्ती

 
 

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला:

 • माहिती अधिकार कायदा, २००५ ची प्रत्यक्ष व्यवहार्यता समजून येईल
 • माहिती मिळविण्यासाठी भारतामध्ये कोठेही प्रक्रियेमधून जाऊन सरकारी कचेरीमध्ये माहिती अधिकार दाखल करता येऊ शकेल
 • कायद्यांतर्गत परिभाषित केल्यानुसार विनंती विनियोग प्रक्रियेची चर्चा करता येईल
 • माहिती अधिकार शासनांतर्गत प्रकटीकरणामधून वगळण्यात आलेली माहिती ओळखू शकाल

अभ्यासक्रमाची रूपरेखा

 
 
 • मॉडयूल 1 – भारतामधील माहिती अधिकार शासन: नागरिकांच्या हातामधील हत्यार
 • मॉडयूल 2 – "माहिती" मिळविण्यासाठी माहिती अधिकार कायदा वापरणे-माहिती मिळविण्यासाठी विनंती अर्ज दाखल करणे
 • मॉडयूल 3 – विनंतीचा विनियोग करणे आणि विनंतीला मान्यता देण्याची कालमर्यादा
 • मॉडयूल 4 – माहिती अधिकार शासनांतर्गत प्रकटीकरणातून वगळलेले माहिती
 • मॉडयूल 5 – अंमलबजावणीचे उपाय
 • मॉडयूल 6 – यशाच्या कथा आणि केस स्टडीज्
 • मॉडयूल 7 – माहिती अधिकाराचा विकास
 • मॉडयूल 8 – निष्कर्ष आणि पुढील मार्ग
 • मॉडयूल 9 – परिशिष्ट
 • प्रमाणपत्र परीक्षा / मूल्यांकन

CERTIFICATION

 

Honors Badge

कोणी हा अभ्यासक्रमाला केला पाहिजे

 • वकील
 • वकिलीचा अभ्यास करणारे
 • सामाजिक कार्यकर्ते
 • पत्रकार
 • माहिती अधिकार दाखल करण्यात रस असलेले सामान्य नागरिक
 • रस असलेले इतर भागधारक

श्रेणी: नवशिके

भाषा: मराठी

कालावधी: 6 महिने

मूल्यमापन पध्दती

शिकणाऱ्यांनी सर्वपाठ जमा केले पाहिजेत आणि अभ्यासक्रमाचे शेवटी अभ्यासक्रम प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये किमान ५०% गुण मिळविणे प्राप्त आहे.

लेखकासंबंधी

रितिका रितू यांच्याकडे S'O'A नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ लॉ, भुवनेश्वरची पदवीची आहे. त्यांना पाच वर्षाच्या S'O'A विश्वविद्यालय, भुवनेश्वर च्या एकत्रीकृत B.Sc. LL.B (Hons) अभ्यासक्रमादरम्यानच्या त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरीसाठी विश्वविद्यालयाचे सुवर्णपदक देण्यात आले आहे. सध्या त्या दिल्ली बार कॉऊन्सिलच्या सदस्य आहेत आणि विविध कायदेविषयक प्रकल्पांचे व्यवस्थापन आणि मार्गदर्शन करण्याचा त्यांना २ वर्षांचा अनुभव आहे.

Learners who viewed in this course, also viewed:

Let’s Start Chatbot