Enquire Now!

कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण

 

कामाच्या ठिकाणी वर्तन 'चूक' किंवा 'वाईट' असल्याचे मान्य करणे आणि तसे वर्गीकरण करणे हे कठीण असू शकते कारण ही समजतू अनेक घटकांवर अवलंबून असते, कामाच्या ठिकाणी असलेली संस्कृती इथपासून ते सहकारी कोणत्या सांस्कृतिक वातावरणातून आलेले आहेत इथपर्यंत. मात्र, लैंगिक छळवणुकीविषयी महिला आणि जनतेमध्ये जनजागृतीची तीव्र उणीव असते. महिला अनेकदा अशा छळाला बळी पडतात आणि त्यामुळे त्यांच्या मानसिक, भावनिक व शारिरीक आरोग्यावर, आणि कामाच्या कामगिरीवर निराशाजनक परिणाम होतो. छळाला बळी पडलेल्या महिलांना त्यांचे हक्क, निवारण यंत्रणा आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करणाऱ्या समित्या यांच्याविषयी माहिती नसल्यामुळे अनेक घटनांची नोंदच होत नाही.

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूक ही संकल्पना आणि त्यासाठी असलेले समर्पक कायदे यांच्याविषयी कर्मचारी, नियोक्ते आणि वकील यांना परिचय करून देणे ही या अभ्यासक्रमाची संकल्पना आहे. यामुळे संस्थेमधील कर्मचाऱ्यांना संशयास्पद वागणूक ओळखण्यास मदत होईल आणि तक्रार नोंदवण्यासाठी कार्यपद्धतीची माहिती होईल. या अभ्यासक्रमामुळे नियोक्त्यांना अशा तक्रारींचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यात आणि कामाच्या ठिकाणी निरोगी वातावरण राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात मदत होईल. लैंगिक छळासंबंधीचे कायदे, निवारण यंत्रणा आणि कायदेशीर परिणाम यांची माहिती घेण्यासाठी तरुण वकील हा अभ्यासक्रम घेऊ शकतील.

शिकण्याचे परिणाम

 
 

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना खालील गोष्टी करणे शक्य होईल:

  • लैंगिक छळवणुकीचे भिन्न वर्तन आणि प्रसंग ओळखणे
  • तक्रार निवारण प्रक्रियेचे वर्गीकरण आणि सादरीकरण
  • कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीची प्रकरणे टाळण्यासाठी मार्गांची चर्चा करणे
  • कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणासंबंधी सल्ला घेण्यासाठी पुरेसा पैसा व वेळ असणे

अभ्यासक्रमाची रूपरेखा

 
 
  • मोड्यूल 1 – कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीचा परिचय
  • मोड्यूल 2 – कामाच्या ठिकाणी लैंगिक छळणवणुकीला प्रतिबंध आणि मनाई
  • मोड्यूल 3 – कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीची तक्रार दाखल करण्यासाठीची कार्यपद्धती
  • मोड्यूल 4 – निष्कर्ष
  • प्रमाणपत्र परीक्षा/मूल्यांकन

CERTIFICATION

 

Honors Badge

हा अभ्यासक्रम कोणी घ्यावा?

  • कर्मचारी
  • नियोक्ते
  • विद्यार्थी
  • वकील
  • संस्थांमध्ये काम करणाऱ्या किंवा लैंगिक छळवणुकीच्या घटनांना प्रतिबंध आणि मनाई करण्यात रस असलेल्या इतर घटकांनी.

पातळी: शिकाऊ

भाषा: मराठी

कालावधी: 6 महिने

मूल्यांकन पद्धती

प्रत्येक मोड्यूलच्या अखेरीस कोडी आणि असाईनमेंट देऊन प्रगतीची चाचणी घेतली जाईल. शिकाऊ उमेदवारांनी अभ्यासक्रमाच्या अखेरीस परीक्षा दिली पाहिजे आणि अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किमान 50 टक्के गुण प्राप्त केले पाहिजेत.

लेखकाविषयी

हरलीन कौर या 2013 पासून दिल्ली आणि चंदीगडमध्ये लिंग अधिकाराच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वकील आहेत. लैंगिक छळवणूक प्रतिबंध आणि कामाच्या ठिकाणी विविधता या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशियल सायन्सच्या ऑनलाईन डिप्लोमा अभ्यासक्रमाची संकल्पना मांडण्यात आणि त्याची रचना करणाऱ्या टीममध्ये सक्रीयपणे सहभागी होत्या. संस्थांच्या आयसीसीसाठी बाह्य सदस्य आणि शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी लिंग आणि मजूर अधिकार या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यावसायिकांची मुलाखत घेतली आहे.

Learners who viewed in this course, also viewed:

Let’s Start Chatbot