Enquire Now!

भारतात पर्यायी तंटा निवारण व्यवस्था

 

न्यायालये आणि न्यायपालिका ही भारताच्या कायदा व्यवस्थेचे मान्यताप्राप्त स्तंभ असताना, व्यावसायिक आणि वैयक्तिक वाद सोडवण्यासाठी पर्यायी तंटा निवारण (एडीआर) या पद्धतीला वाढत्या प्रमाणात प्राधान्य मिळत आहे. अब्जावधी रुपयांचा दोन-देशांदरम्यान बांधकाम व्यवसायातील तंटा असो किंवा पती व पत्नीदरम्यानचा निव्वळ घरगुती वाद असो, एडीआरची तंत्रे ही व्यापक संदर्भात वापरली जातात आणि पारंपरिक खटल्यांपेक्षा त्यामध्ये अधिक लाभही मिळतात. मात्र, अनेक वकील, सल्लागार आणि व्यावसायिकांना अचूकपणे तंटा निवारणाचा दृष्टीकोन नसतो आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये आवश्यक त्या कौशल्यांचा अभाव असतो.

या अभ्यासक्रमामध्ये भारतात उपलब्ध असलेल्या आणि त्याच्या निरनिराळ्या वातावरणातील – घरगुती तसेच आंतरराष्ट्रीय - उपयुक्तता एडीआरच्या विविध रीतींची रूपरेषा आखण्यात आली आहे. तंटा निवारणाच्या प्रत्येक तंत्रावर चर्चा करणे आणि स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर लोकांच्या विविध गटांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, कुशल वाटाघाटी करणारे, मध्यस्थ आणि लवाद तयार करणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे.

अभ्यासक्रमाचा परिणाम

 
 

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना खालील गोष्टींशी संबंधित ज्ञान आणि कौशल्य प्राप्त होईल :

 • एडीआर यंत्रणा आणि पारंपरिक खटल्यांशी त्याची तुलना
 • सरावामधील निरनिराळी एडीआर तंत्रे आणि त्यांच्यामधील फरक
 • निरनिराळ्या एडीआर तंत्रांसाठी व्यावहारिक कार्यपद्धती
 • निरनिराळ्या एडीआर तंत्रांच्या संदर्भात स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय अवकाशाचे सन्मुख येणे

अभ्यासक्रमाची रूपरेखा

 
 
 • मोड्यूल 1 – लवाद, मध्यस्थी आणि सलोखा यांचा परिचय
 • मोड्यूल 2 – लवादावरील कायद्यांचा आढावा
 • मोड्यूल 3 – लवाद आणि सलोखा कायदा, १९९६ अंतर्गत लवादासाठी कामकाज
 • मोड्यूल 4 – आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवाद
 • मोड्यूल 5 – एडीआरचे मध्यस्थी, सलोखा आणि इतर स्वरूप
 • मोड्यूल 6 – एडीआर पद्धतींचे विभागवाप व्यावहारिक उपयोजन
 • मोड्यूल 7 – निष्कर्ष
 • प्रमाणपत्र परीक्षा/मूल्यांकन

CERTIFICATION

 

Honors Badge

हा अभ्यासक्रम कोणी पूर्ण करावा?

 • कायदेशीर सल्लागार
 • वकील
 • कायद्याचे विद्यार्थी आणि संशोधक
 • पर्यायी तंटा निवारण यंत्रणेत रस असलेले इतर भागीदार

स्तर: मध्यम

भाषा: मराठी

कालावधी: 6 महिने

मूल्यमापनाची पद्धत

अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व असाईनमेंट सादर केल्या पाहिजेत आणि अभ्यासक्रमाच्या अखेरीस प्रमाणपत्र परीक्षेत किमान 50 % गुण मिळवले पाहिजेत.

लेखकाविषयी

श्रीमती गीतांजली शर्मा या अर्हताप्राप्त वकील, प्रमाणिकत मध्यस्थ आणि सध्या कर्नाटक सरकारच्या सल्लागार आहेत. त्यांनी लक्ष्मीकुमारन अँड श्रीधरन अॅटर्नीजच्या अँटीट्रस्ट टीममध्ये वरिष्ठ वकील म्हणून काम केले, त्यामध्ये त्या तेल आणि वायू, टॅक्सी संघटना, वाहन उत्पादक कंपनी, कन्व्हेयर बेल्ट व रंग उद्योग अशा विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये, स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील विवादास्पद तसेच सल्लागार अशा दोन्ही कामांमध्ये सहभागी होत्या. त्यांनी नकुल दिवाण, बॅरिस्टर (20 इसेक्स, स्ट्रीट लंडन) यांच्या दिल्ली चेम्बर्समध्ये असोसिएट म्हणूनही काम पाहिले आहे.

श्रीमता शर्मा यांनी केंब्रिज विद्यापीठातून कायदा या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. त्या शिकागो विद्यापीठाच्या हॅरिस पब्लिक पॉलिसी स्कूलच्या फेलो आहेत. त्यांना प्रतिष्ठेच्या हेग अॅकॅडमी ऑफ इंटरनॅशनल लॉ या ठिकाणी प्रायव्हेट इंटरनॅशनल लॉ प्रोग्रामला उपस्थित राहण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती आणि 2015मध्ये अमेरिकन बार असोसिएशन एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल मेडिएशन समिटमध्ये सहभागी होण्यासाठी शिष्टमंडळाच्या सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती.

त्यापूर्वी, त्यांनी अमेरिकन बार असोसिएशन (एबीए), सेंट्रल बोर्ड फॉर सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) आणि युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन (यूजीसी) यांच्यासाठी शिकण्याचे मोड्यूल आणि टूलकिट तयार केले आहेत.

Learners who viewed in this course, also viewed:

Let’s Start Chatbot